४. नवा भात खाने (नवखाने)
August 23, 2009 Leave a comment
भाद्रपद
४. नवा भात खाने (नवखाने)
ह आदिवसीचा पारम्परिक सण आहे. पुर्वी काळि कुडई कलीव, दुल्हा अशा प्रकरच्या भाताच्या जाति तिन महिन्यात म्हन्जे भाद्रपद महिन्यात तयार होत असत. यच्यातिल काही जाति आज अस्तित्वत नाहित. भात तयार झले कि भद्रपदातिल एखद्या मन्गलवारि किवा सोयिच्या वारि तयार झलेले भात कापुन घरि आनुन भाताचि पुजा करुन मग मळनि करतात. सन्ध्याकाळि त्या भाताचे पोहे व जेवण करतात. नव्या भाता सोबत नव्या भाज्या पहिजेत म्हनुन आळुचे देठ, माठ, दान्गर, मासे, खेकडे, अशी भजि करुन रात्रि कुलदैवत हिरवा देवाला दिवा लाउन सर्व लहन मोठि मन्डळि एकत्र बसतात. एक वडिल मणूस ताटात पोहे घेउन सर्व मन्डलिन्च्या हातावर पोहे देतो. सर्वाना पोहे वाटल्या नन्तर वाटनारा माणुस सर्वाना उद्देशुन पुरले कि नहि विचारतो. जमलेल्या मणसाकडुन हो पुरले असा जाब अल्यावर वाटनारा सान्गतो, “आपल्या कष्टची नवि कणसरी अथा सगलि जना खा.” नवा भात {पोहे} खातान एक मेकाना भेटतात व वडिलधारया मणसान्च्या पाया पडतात. नन्तर दारु सोबत नवभजिचा चाखना करुन वडील मन्डळि दारु पिवुन झाल्यावर जेवण करतात. जेवण झाल्यावर कधि कधि कामडि नाच, तर कधि तारपा नाच करुन नव्यभाताच्या पिकाचा, नव्या सणाचा आनन्द साजरा करतात.