warli artist – rajesh mor
April 11, 2010 Leave a comment
दोन शब्द राजेश मोर सोबत ….
माझे शिक्षण १० पास, कासा येथे शाळेत होतो, घरची परिस्थिती बेताचीच असल्याने मला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
जंगल चा रहिवासी, जंगलातला अनुभव, शेती, आणि आजूबाजूचा परिसर म्हणून आदिवासी चित्रकला हि पारंपारिक कला मला चांगली अवगत होती.
शिक्षन सोडून दिल्या नंतर सवासनी सोबत चौक लिहिण्या साठी जात असे. असे करून चौक लिहिणे मला चांगल्या प्रकारे येवू लागली.
आता जवळ जवळ १२ वर्षे मी चौक काढणे आणि तशी इत्तर कामे करतो आहे.
मी इयत्ता ५वि पासून चौक काढत होतो, नंतर मी आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे नाव नोंदणी केली, त्यामुळे मी २००३ साली दिल्ली च्या प्रगती मैदानावर वारली चित्रकला [आदिवासी चित्रकला ] प्रदर्शन केले. तिथे काही अधिकारी आणि मान्यवर लोकांशी ओळख झाली.
दरम्यान कोल्हापूर हून मला खास वारली चित्रकार म्हणून ओळख पत्र देण्यात आले.
त्या नंतर दुसरे प्रदर्शन मुंबई [ महालक्ष्मि सरस प्रदर्शनी ] आणि त्या नंतर राजस्थान, दिल्ली, बेंगलोर, भोपाल, हैदराबाद, गोवा, काश्मीर, अहमदाबाद, इंदोर , अश्या ठिकाणी प्रदर्शन भरवण्याचे भाग्य मला मिळाले. हे सगळे करत असताना मला बरेच अनुभव आले ज्याचा उपयोग करून मी आता ग्राहकाला आवडेल अशा पद्दतीने चित्र बनवू शकतो. लोकांची आवड निवड कशी असते त्याचा अंदाज आहे आणि आपली आदिवासी कला त्यांच्या आवडी नुसार कसी मांडवी हे जाणून आहे. हे सगळे करताना माझी ओळख म्हणून लोक मला मिनिएचर कामा साठी ओळखतात [ बारीक नक्षि काम]
आणि आणखीन नवीन प्रयोग करण्या साठी मी नेहमी तयार आहे. आपली आदिवासी कला जगाच्या नकाशावर पोहचण्य साठी माझ्या कडून जे काही शक्य होईल ते मी करण्या साठी आनंदाने तयार आहे.
Rajesh mor