Dahanu darshan – mahalaxmi

http://www.youtube-nocookie.com/v/3UoCnza5gIw&hl=en_US&fs=1&border=1

Dahanu darshan – gambhirgadh

http://www.youtube-nocookie.com/v/0CYeiUJfAv0&hl=en_US&fs=1&border=1

Dahanu darshan – gambhirgadh

http://www.youtube-nocookie.com/v/lVUkc174LiA&hl=en_US&fs=1&border=1

dahanu darshan – asheri gadh

http://www.youtube-nocookie.com/v/a86XIZ59kTI&hl=en_US&fs=1&border=1

Dahanu darshan – saptashrungi – nikane

http://www.youtube-nocookie.com/v/lLcjJFzVX28&hl=en_US&fs=1&border=1

Dahanu darshan – santoshi ashagadh

http://www.youtube-nocookie.com/v/QPc0wk2-mik&hl=en_US&fs=1&border=1

टेक केअर दोस्त


हाय…

पाऊस मुक्कामी आलाय! पण काही म्हणा, आपल्या शहरांतल्या पावसाला गर्दीचा एक तक्रारखोर आवाज असतो. इथे तो भेटतो तेव्हा लेट झालेल्या ट्रेनच्या गर्दीत शिव्या खात असतो किंवा रस्ते तुंबवून गुडघाभर साचलेल्या पाण्यात रिपरिप करत आपल्याला चिडवत राहतो…या पावसाला सरळ टांग मारायची. वीकेण्डला सॅक पाठीवर टाकायची. कॅमेरा लटकवायचा. रेनीवेअर अडकवायचं, कंपूला फोनाफोनी करायची, लोकलच्या वेळा नीट बघायच्या, नाहीतर सरळ गाडी काढायची आणि पावसाला भेटायला रानात जायचं….अस्साच प्लॅन करताय ना? पण मंडळी, या मान्सून पिकनिकपूर्वी लेट मी शेअर वन थिंग.

आमच्याच ऑफिसमधला तो ग्रुप. वेगळ्या सेक्शनमधला. पाऊस सुरू झाल्याबरोबर त्याला सलामी द्यायला सगळ्यांनी कोकणात जायचं ठरलं. रात्रीचा प्रवास करुन सकाळी सगळे तिथं पोहोचले. नदीचं खळाळतं पाणी आणि हिरवाकंच निसर्ग यांनी वेड लावलं सगळ्यांना. कुणाचीही वाट न पाहता तो तर धावलाच पाण्याकडे. कपडे काढून थेट पाण्यात. भय नव्हतंच , कारण तो पट्टीचा पोहणारा. उडी मारली ती थेट तळाशीच. वर्षानुवर्षांचा गाळ पोटात साठवलेल्या नदीने त्यालाही अलगद पोटात घेतलं. हातपाय हलवले असतील खूप. वर यायची धडपडही केली असेल, पण खोल रुतत गेला तो. मित्र धावले. कुणी पॅनिक होऊन उड्या मारल्या नाहीत हे नशीब. गावकऱ्यांना बोलावलं. बराच वेळ शोधाशोध केली. सापडला नाहीच. रात्री शोध थांबवावा लागला. दुसऱ्या दिवशी सापडला, डोळे माशंनी खाल्ले होते…खूप भेसूर दिसत होता म्हणे…आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. चोवीस वर्षांचा.

पाऊस वाढेल, तसतशा बातम्या येत राहतील. आपण वाचू. माहितीचं कुणी असेल तर तात्पुरते हळहळू. पाच मिनिटं अस्वस्थ होऊ आणि सोडून देऊ. आपली पिकनिक प्लॅन करताना हे कुणाच्या ध्यानातही राहणार नाही.

पाण्याचं आदिम आकर्षण असतंच आपल्या सगळ्यांमध्ये. कदाचित आपण पाण्यामधून उत्क्रांत झालो आहोत म्हणून असेल, जन्माला येण्यापूवीर् नऊ महिने पाण्यातच वाढलो म्हणून असेल किंवा शरीरात नव्वद टक्के पाणी घेऊन वावरतो म्हणून असेल. या आकर्षणातूनच पाण्याकडे ओढले जातो आपण. हिरव्या डोंगरावरून फेसाळत कोसळणाऱ्या शुभ्र धबधब्यांखाली भिजणं, चिंब पावसांत समुदाच्या लाटांशी मस्ती करणं, तुडुंब वाहणाऱ्या खळाळत्या गढूळ नदीला आव्हान देणं…हे सगळं उसळत्या तरुणाईला खुणावणारं असतंच, पण बहुतेक वेळा धबधब्यांपर्यंत पोहोचेपर्यंत कडेकपारीतून चालताना सैल झालेली एखादी दरड तुमच्यासह पात्रात कोसळू शकते. खूपदा पाणी दिसतं शांत पण अंदाजापेक्षा ते प्रचंड खोल असतं. कुठे याच शांत पाण्याखालचे भोवरे अशा वेगाने खाली खेचतात की परत नखही दृष्टीला पडू नये. या दिवसांत समुद्रही मित्र राहत नाही, अनोळखी होऊन जातो. जीवदायिनी नदी जीवघेणी होते. कितीही पट्टीचे पोहणारे असाल तरी अशावेळी फालतू आत्मविश्वास न ठेवलेलाच बरा. ज्या ठिकाणाविषयी काहीही माहिती नाही अशा ठिकाणी जीवघेणं साहस करायलाच पाहिजे का? पुष्कळदा किनाऱ्यांवर ते ठिकाण पोहण्यासाठी किती धोकादायक आहे. गेल्या काही वर्षांत किती लोकांनी प्राण गमावले, याची आकडेवारी लिहिलेला बोर्ड असतो, पण त्याच्याकडेही सोयीस्कर दुर्लक्ष करतो आपण. बरं आपण निवडलेली ठिकाणंही इतकी आतल्या भागात असतात की आराडाओरडा करूनही मदत मिळण्याची शक्यता नसते. मिळाली तरी पुष्कळदा मृतदेह वर काढण्याच्या वेळी ती पोहचते.

आणखी एक गोष्ट. ट्रीप प्लॅन करताना ड्रिंक्सचा क्रेट कुणी आणायचा हे पण ठरतं का तुमच्यात? एंजॉय करण्याच्या व्याख्येत हे असू नये असं म्हणून तुमचा मूड खराब करणार नाही. पण दारू पिणं ही चार भिंतींच्या आत बसून करायची गोष्ट आहे असं नाही वाटत तुम्हाला? मस्त पाऊस पडतोय. सोबत जीवलग दोस्तमंडळी आहेत. निसर्ग त्याचं वैभव तुमच्यासमोर खुलं करून बसलाय. ही नशा पुरेशी नाहीये? पावसाळी सहलीसाठी आपल्यासारखीच कुटुंबही बाहेर पडतात. आपण आरडा ओरडा करत नशेत अचकटविचकट बोलत असतो, तेव्हा बायका, लहान मुलं, वयस्क माणसं यांनी तिथं मिनिटभरही थांबू नये असा माहौल असतो. कमरेला नावापुरतं वस्त्रं. हातात बाटली नाहीतर कॅन, अचकट विचकट अंगविक्षेप, अर्वाच्य भाषा हेच तरुणाईचं इंप्रेशन व्हावं असं वाटतं तुम्हाला? खूपदा किल्ल्यांवर जातो आपण पाऊस एंजॉय करायला. इतिहास घडवायला आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं असतं तिथं बाटलीतून हिंदकळणारी दारू सांडायची? ‘हर हर महादेव’च्या गर्जना झाल्या तिथं चिअर्सचा घोष करायचा?… जस्ट थिंक फ्रेंड्स. अशा तरंगत्या अवस्थेतच अपघातांची शक्यता कैक पटीने वाढते. तासाभराची कैफ आयुष्यातून उठवू शकतो. तेव्हा भान विसरून एंजॉय करू या पण बेभान नाही व्हायचं हेही ठरवू या.

आयुष्य इतकं स्वस्त नसतं दोस्त! अशा सहलीतच नव्हे तर नेहमीच हे डोक्यात असायला हवं. लोकलच्या गर्दीत एका हाताने लोंबकळताना, हेल्मेट शिवाय सुसाट बाइक हाकताना, एक्स्प्रेस वेवरून जाताना स्पीडोमीटरच्या काट्याला थकवताना…नेहमीच. आई वडिलांचा जीव असतो तुमच्यात. कुणीतरी जन्मोजन्मीची गाठ मारून आयुष्य जोडलेलं असतं तुमच्याशी. मित्रांच्या हृदयात जागा असते तुमची, डोळे तुमच्या वाटेवर अंथरून ‘पपा काय आणलं’, म्हणत चिमुकले हात पसरून कुणीतरी वाट बघत असतं तुमची. तुम्ही पाहिलेलं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न अर्ध्या वाटेवर तुमच्या प्रतीक्षेत असतं… सो बी केअरफुल.

नाऊ प्लान आऊट द थिंग अँड एन्जॉय . मग कुठे जाताय या वीकेण्डला? कळवा.

हॅव अ हॅपी अॅण्ड सेफ मॉन्सून पिकनिक. टेक केअर दोस्त!

रानात, फुलात; कोकणच्या गावात!

हातात रिझव्हेर्शन, तारांकित हॉटेलातील बुकिंग, ठरीव न्याहरी-जेवण आणि प्रेक्षणीय स्थळे किंवा रिझॉर्टमधील तेच वातावरण…यांच्या बाहेर पडून स्वत: सहल आखून कोकणासारख्या हिरव्यागार प्रांतात जाण्याचा अनुभव घ्यायला हवा. तिथल्या एखाद्या छोट्याशा गावात, निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना काही दिवस राहायला मिळणे आणि सर्वांनी मिळून समूहजीवनाचा अनुभव घेणे, यातली मजा काही औरच…

………..

मे महिन्याच्या भल्या मोठ्या सुटीत करायचं काय, या मुलांना आणि त्यांच्या पालकांना पडणारा प्रश्ान्च असतो. दहावीत आणि बारावीत जाणाऱ्या मुलांना तर आता मे महिन्याची सुटी असते, असे आपण म्हणतच नाही. त्यांचा लगेच अभ्यास सुरूही होतो. पण इतर मुलांपैकी काही जातात छंद वर्गात. काही सचिन तेंडुलकरच्या फोटोच्या पाया पडून, कीटचे ओझे सांभाळत मैदानावर जातात. काही लिटल चॅम्प होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गाणे शिकायला जातील. अर्थात, हे सारे न करणारीही हजारो मुले असतातच.

काही कुटुंबांमध्ये आता विचार सुरू होईल बाहेरगावी जाण्याचा. एखाद्या सहल कंपनीमध्ये भरभक्कम पैसे मोजून आठ दिवसांसाठी जायचे. ते ही घरातल्या तिघांनी किंवा चौघांनी. मात्र, अशा सहलींमध्ये जी प्रेक्षणीय स्थळे मोठ्या माणसांना बघायची असतात, ती पाहण्यात लहानग्यांना अजिबातच रस नसतो. त्यामुळे त्यांची रड, कंटाळा, धुसफूस सांभाळत; कधी त्यांना रागावत तर कधी प्रेमाने समजावत सगळ्यांबरोबर दिवसभर फिरत राहायचे आणि रात्री तारांकित हॉटेलात डोळे मिटत असताना शिरायचे. लहानग्यांचे आणि आपले कपडे जमेल तसे पिळून टाकायचे. मोबाईलवर सकाळी सहाचा गजर लावून झोपायचे. आणि खर्च बराच झाला पण आराम आणि पाहणे खूप झाले, असे म्हणत स्वत:चीच समजूत काढत परत मुंबई गाठायची. दुसऱ्या दिवशी धावपळ सुरू.

खरे पाहता आपल्याला आवश्यकता असते सैलसर व स्वच्छंदी जीवन जगण्याची. काटेकोर धावपळीचा, रोजच्या पोशाखी वागण्याचा आणि रोज आपण खात असलेल्या खाद्यपदार्थांचा कंटाळा घालवण्याची.

थोडा विचार केला तर यातून आपल्याला चांगला मार्ग काढता येईल. आपल्याला आणि मुलांना मनमोकळे व मनसोक्त राहता येईल. घरी असणाऱ्या महिलांनी मुलांचे बाबा सोबत आले तर त्यांच्यासहित किंवा त्यांना जमणार नसले तर त्यांच्याशिवाय, आपल्या समवयस्क मैत्रिणींचा छानछोटा ग्रुप बनवावा. हा गुप तीनचार जणींच्यावर मात्र नसावा. मग कोकणातल्या एखाद्या खेड्यातले घर १५-२० दिवसांसाठी भाड्याने मिळवावे. आसपास थोडी चौकशी केली तर कोकणातल्या कितीतरी गावांमधली अशी घरे उपलब्ध होऊ शकतील. कोकणाचा हा सारा परिसर अत्यंत रम्य तर आहेच पण तो अत्यंत सुरक्षित प्रदेश आहे. कोणत्याही गावात कोणत्याही वेळी तुम्ही बिनघोर राहू शकता. फिरू शकता. या गावांमधले गावकरी काही त्रास तर देणार नाहीतच उलट जमेल तेवढी मदत करतील.

कोकणात आज बऱ्याच सोयी आहेत. तालुक्यांच्या ठिकाणी सुपर माकेर्टपासून-बँकापर्यंत सगळ्या सोयीसुविधा आहेत. सर्व गावांमध्ये पिशवीतून दूध मिळते. बहुतेक गावांमध्ये आता नळपाणी योजना आहेत. तिथे गॅस सिलेंडरही सहज मिळतो. दूरध्वनी सेवा खेडोपाडी पोहोचली आहे. गरज पडल्यास, डॉक्टरही आहेत. पण त्यांची गरजच भासणार नाही. मुंबईहून नेलेली औषधेही न वापरता परत आणावी लागतील.

परीटघडीची बांधिलकी नसल्यामुळे मोकळा-चाकळा वावर व मुलांचे उघड्या अंगाने दिवसभर झाडामाडात हुंदडणे, गुराढोरांचा आणि झाडाझुडपांचा अनोखा प्रेमळ सहवास हे सारे वातावरण मुलांना अनुभवू दे. इन्फेक्शन आणि परीटघडीचे मॅनर्स यांचा मुळीच बाऊ करू नका. सगळ्या भीती विसरून मस्त राहात येईल. मैत्रिणी मैत्रिणी मिळून रोज नवनवीन पदार्थ करून मनसोक्त खाता येतील. अशा वातावरणात मुले न कंटाळता एकमेकांमध्ये मिळून-मिसळून दिवसभर खेळत राहतील. दिवसभर खेळून दमून त्यांना रात्री मस्त झोप येईल. सकाळी उठून ती पाहतील तर एखादी मनीमाऊ त्यांच्या अंथरूणात येऊन झोपलेली असेल. तुम्हीही पहाटे अंगणात येऊन बसलात तर तुम्हाला समाधी लागल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

कोकणात जायला आता भरपूर वाहतुकीच्या सोयी सहज उपलब्ध आहेत. रेल्वे आहे, खासगी बस आहेत, एसटी आहेत. आराम बसमधील प्रवासापेक्षा, साध्या एसटीतून अवश्य प्रवास करून बघा. एसटीचे जाळे आता अगदी छोट्या गावांपर्यंत पोहोचले आहे. तसेच, एसटीच्या वेळापत्रकातही खूप नियमितता आली आहे. एसटीतून प्रवास म्हणजे समाजातील सर्व प्रकारच्या लोकांशी प्रत्यक्ष संपर्क. या अशा संपर्काचा अनुभव मुलांना जरूर घेऊ द्यावा. त्यातून त्यांच्या संवेदना अधिक जाग्या होतील. कदाचित्, न दिसलेले जगही त्यांना या प्रवासात दिसण्याची शक्यता आहे.

असे हे मुक्त प्रवासाचे १५-२० दिवस तुम्हाला वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा देतील. तुम्हाला व तुमच्या मुलांना हे निसर्गाच्या सहवासातले अनुभव नक्कीच समृद्ध करतील. तुमच्या माणूसपणाला नवा आराम मिळेल. एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, आपसात देवघेव करून, लहानसहान श्रम एकत्रित करून मुलांवर एक वेगळाच संस्कार नकळत झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या राज्यातील एक प्रदेश त्यांना ‘आतून’ दिसेल, हा आणखी एक फायदा. समूहजीवनाचा एक नवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

साऱ्या गोष्टी तयार आणि जिथल्या तिथे मिळण्याऐवजी स्वत: आखणी करून अमलात आणण्यातही मजा असते. ती मजा अशा ट्रिपमुळे अनुभवता येईल. मग विचार कसला करताय? जमवा मित्रमैत्रिणी आणि मुलांना घेऊन स्वत: सफरीवर निघा!


रिफ्रेश व्हायचंय?

पद्मश्री राव

वीकएण्डला अनेक जण छोट्या ट्रिप आखत असतात. त्यासाठी मुंबईपासून जवळ असलेल्या ठिकाणांना प्राधान्य दिलं जातं. बरेचदा अशा ट्रिप एखाद्या बीचवर किंवा रिसॉर्टवर काढल्या जातात. पण एखाद्या धरणावर जाण्याचा बेत तुम्ही कधी बनवला आहे का? मुंबईपासून जवळच असलेल्या बदलापूरमध्ये एक सोडून दोन धरणं आहेत. बारवी डॅम आणि चिखळोली डॅम. या दोन्ही धरणांचा परिसर रम्य आणि शांत असल्याने एका दिवसात रिफ्रेश होण्यासाठी इथे जायला काहीच हरकत नाही.

………

दशकभरापूवीर् ठाणे जिल्ह्यातलं देखणं आणि नेटकं गाव म्हणून बदलापूर प्रसिद्ध होतं. आता मात्र बदलापूरने कात टाकून शहरी रूप धारण केलं आहे. बदलापूर, अंबरनाथ ह्मद्ध गावांवर मुंबईचा प्रभाव पडल्यामुळे त्यांचा विकास झपाट्याने झाला. बदलापूर आता शहर बनलं असलं तरी त्याने आपल्या ‘गावपणा’च्या खुणा जपल्या आहेत. स्टेशनपासून आत गेल्यावर हे गाव एकेकाळी किती टुमदार, रमणीय असेल याची साक्ष मिळते. या परिसरात पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. विशेषत: एक दिवसाच्या सहलीसाठी ही ठिकाणं चांगली आहेत. बदलापूरच्या बारवी डॅमवर हौशी पर्यटकांची बरीच गदीर् दिसते.

बारवी हे उल्हास नदीवर बांधलेलं धरण आहे. इथलं निसर्गसौंदर्य आपल्याला मोहीत करतं. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर सगळीचकडे फिरता येत नाही. बारवी डॅमच्या परिसरात अनेक रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या निवास-भोजनाची व्यवस्था होतेे. बदलापूर स्टेशनपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर हा डॅम आहे. हा सारा परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला आहे. उल्हास नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडणारा एक पूल आहे. मात्र इथे पुलाखाली जाण्यास मनाई आहे.

सुट्टी असते तेव्हा अनेक जण एखाद्या बीचवर जाणं पसंत करतात. अलिबागचे सर्वच समुदकिनारे सुट्टीच्या दिवशी गजबजलेले असतात. परंतु थोडा बदल म्हणून एखाद्या वीकएण्डला मुंबईपासून जवळच असलेल्या बारवी डॅमला जायला काही हरकत नाही.

बदलापूरातलं आणखी एक धरण प्रेक्षणीय आहे. ते म्हणजे चिखळोली धरण. बारवी डॅमच्या तुलनेत कमी प्रसिद्ध असलेलं हे धरण बदलापूरच्या पूवेर्ला आहे. बदलापूर स्टेशनपासून सुमार सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. हे धरण छोटेखानी असलं तरी आजूबाजूचा परिसर मात्र प्रेक्षणीय आहे. बदलापूर स्टेशनपासून थेट रिक्षेनेही इथपर्यंत येता येतं. बारवी डॅम इतकी सुरक्षाव्यवस्था इथे नसली तरी हे धरण तुलनेत कमी धोकादायक आहे. तरीही पर्यटकांनी अगोदर माहिती घेतल्याशिवाय पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये. चिखळोली धरणाचा परिसर अतिशय शांत आहे. इथे जाण्याची खरी मजा पावसाळ्यात आहे. कारण पावसाळामुळे फुललेली इथली हिरवळ भुरळ पाडते. पण पावसाळ्याखेरीज एरव्ही कुठलाही मोसमात चिखळोली धरणाला भेट द्यायला हरकत नाही कारण शांत ठिकाणी थोडा वेळ घालावायची इच्छा असणाऱ्यांना यासारखं दुसरं ठिकाण सापडणार नाही.

बारवी किंवा चिखळोली धरणावर जायचा बेत आखत असल्यास काही गोष्टी ध्यानात ठेवा:

* बारवी डॅमला जाण्यासाठी बदलापूर स्टेशनपासून बससेवा उपलब्ध आहे.

* चिखळोली डॅमला रिक्षाने जात येत असलं तरी रिक्षा परतीसाठी थांबणारी असावी. कारण परत जाण्यासाठी इथे कुठलंही वाहन उपलब्ध नाही.

* स्वत:चं वाहन असल्यास सहलीचा आनंद अधिक मोकळेपणाने लुटता येईल.


विक्रमगडचा निसर्ग खुणावतो!

तुम्हाला स्वत:चा शोध घ्यायचाय. रोजच्या धावपळीतून मस्त वीकेण्ड एन्जॉय करायचाय. नाहीतर समस्त जुन्या मित्रमंडळींच

ा झकास ट्रेकिंगचा प्लॅन आहे. शहराच्या धकाधकीपासून दूर कुठेतरी रम्य ठिकाणी जायचं असेल, तर मग तुम्ही नक्की विक्रमगडचा रस्ता धरा, असा सल्ला दिलाय बिनधास्त’ शर्वरी जमेनिस हिने.

…….

ठाणे-जव्हार रस्त्यावर असलेला विक्रमगड हे माझं खास आवडतं ठिकाण. चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने आम्ही कलाकार वेगवेगळ्या साइट, लोकेशन्स आणि शहरांमधे फिरत असतो. या ठिकाणांचं खास वेगळेपण, त्यांची वेगळी अशी ओळख, तिथे प्रसिद्ध असलेल्या वस्तू आणि पदार्थ यांचा शोध घेऊन हमखास त्यांना भेटी देणं ठरलेलंच. त्या त्या दिवसांपुरतं आम्ही तिथलं आयुष्य जगतो. पण शूटिंगमुळे हा नित्याचाच भाग झाला आहे. त्यामुळेच खास धमाल किंवा वेगळं काही अनुभवायचं असेल, मस्त फिरायचं असेल तर हटके अशा विक्रमगडला भेट द्यायलाच हवी.

ट्रेकिंगसाठी निघायचं म्हणजे खास आकर्षण असलेल्या रिव्हर क्रॉसिंग, जंगल सफारी, रॉक क्लायम्बिंग यांचाही आनंद इथे उपभोगता येतो. शिवाय इथली शांतता, निसर्गरम्य परिसर, नदीचे निर्मळ-स्वच्छ पाणी, शुद्ध हवा अगदी मन मोहून टाकणारी आहे. विक्रमगडावरील एका आदिवासी पाड्यावर दिवेकरांचं मस्त रिसॉर्ट आहे. खास ग्रामीण टच असलेल्या या रिसॉर्टवर धम्माल आणि मनमुराद जगण्याचा आनंद लुटता येतो. पण शांत आणि मोकळ्या वातावरणामुळे निसर्गाच्या अधिक जवळ गेल्याचं समाधान मिळतं. या रिसॉर्टवर राहण्याची उत्तम सोय तर आहेच शिवाय अस्सल ग्रामीण टच असलेलं रुचकर जेवणही उपलब्ध आहे. या मोकळ्या वातावरणात आपल्याला मस्त सपाटून भूक लागते आणि या अस्सल चवीच्या जेवणाने वेगळंच समाधान मिळतं. मुंबईपासून अगदी जवळ शिवाय निसर्गाच्या सान्निध्यात एक-दोन दिवस राहून पुन्हा ताजं तवानंही होऊ शकता येतं. मग कधी निघताय ‘भटकंती’साठी विक्रमगडला? इथला शांत परिसर अनुभवायला. स्वत:चा शोध घ्यायला?

शब्दांकन : विनय उपासनी


माहुलीचा इतिहास जागवताना

माहुली किल्ल्याचा स्वराज्यात समावेश झाल्याला ३५१ वर्षं पूर्ण झाल्याबद्दल माहुली निसर्ग मंडळातफेर् शहापूर, तसंच

माहुलीच्या परिसरात ‘माहुली महोत्सव’ आयोजित केला होता. त्यानिमित्त माहुलीच्या इतिहासाला दिलेला हा उजळा.

……

महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांप्रमाणेच माहुली इतिहासाबद्दल फारसा बोलत नाही. भंडारगडावरील चोर दरवाजातल्या शिलालेखाव्यतिरिक्त कुठल्याही लिखित नोंदी माहुलीवर नाहीत. परंतु त्याचा ज्ञात इतिहास खरोखरच अभिमानास्पद आहे. या किल्ल्याचं बांधकाम शिलाहारांच्या काळात झालं, असा उल्लेख ठाणे जिल्हा गॅझेटिअरमधे सापडतो. परंतु माहुली किल्ल्याचाच एक भाग असलेल्या भंडारदुर्गावरील पाण्याच्या टाक्यावरून तो शिलाहारांपूवीर्च्या काळातही अस्तित्वात असावा. याला प्रमाण म्हणजे या पाण्याच्या टाक्याची बांधणी. अशी बांधकामं लेण्यांचा काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातवाहन कालखंडात केली जात.

किल्ल्याचा ठोस पुराव्यांवर आधारित इतिहास १४८५ पासून सुरू होतो. १४८५ मधे निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने कोकणातील इतर किल्ल्यांबरोबरच माहुलीचा किल्लाही ताब्यात घेतला. १६३५ मधे संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर शहाजी राजांनी निजामाचा शेवटचा वंशज मूतीर्जा याला निजामशाह म्हणून घोषित केलं. निजामशाही संपवण्यासाठी १६३५ मधे शाहजहान स्वत: महाराष्ट्रात उतरला होता. विजापूरच्या आदिलशहाला त्याने आपल्या बाजूला वळवलं. निजामशाही वाचवण्याच्या धामधुमीत पेमगिरी-जीवधनचा किल्ला सोडून शहाजीराजांनी लहानगा शिवबा आणि जिजाऊंसह माहुलीचा आश्रय घेतला. १९६३ मधे मुघल सेनापती खानजमान आणि रणदुल्लाखान यांनी माहुलीला वेढा दिला आणि शहाजीराजे आणि निजामशहाची कोंडी केली. ऑक्टोबर १६३६ तहामधे शहाजीराजांना माहुलीचा किल्ला खानजमान आणि रणदुल्लाखानाकडे सुपूर्द करावा लागला. निजामशाही बुडाली आणि त्याचबरोबर शहाजीराजांचे मराठेशाहीचं स्वप्न भंगलं. त्यांना आदिलशहाची चाकरी स्वीकारणं भाग पडलं. शहाजीराजांची बंगळूरला रवानगी करण्यात आली. त्यानंतर माहुलीचा किल्ला कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे ये-जा करत राहिला. १६५७ मधे कल्याण-भिवंडी फत्ते करून स्वराजाच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवून शिवाजी महाराज जातीने माहुलीवर चालून गेले. ८ जानेवारी १६५८ मधे शिवाजी महाराजांनी तो मोगलांकडून जिंकला आणि शहाजीराजांच्या पराभवाचे उट्टं फेडलं. पुढील केवळ आठ वर्षं माहुली स्वराज्यात होता. १६६५ मधे मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात माहुलीचा ताबा पुन्हा मोगलांकडे गेला.

शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका होताच उत्तर कोकणाच्या मोहिमेदरम्यान शिवाजी महाराजांनी १५०० मावळ्यांसह जातीने रात्री अचानक छापा घालून माहुलीचा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला. पण या मोहिमेत १००० मराठे कापले गेले. फारच जबर फटका महाराजांना बसला. मात्र महाराजांनी लवकरच संधी साधली. मोरोपंत पिंगळ्यांनी माहुलीस वेढा दिला. सुमारे दोन महिने माहुलीस वेढा टाकून हल्ले सुरू होते. १६ जून १६७० रोजी निकाराचा एल्गार झाला आणि माहुलीवर पुन्हा एकदा मराठ्यांचे निशाण चढले, असं या लढाईचं वर्णन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं आहे. तेव्हापासून १८१७ मधील इंग्रज आणि पेशवे यांच्यातल्या पुणे तहापर्यंत जवळजवळ दीडशे वर्षं या किल्ल्याचं स्वामित्व मराठ्यांकडे होतं. एक अभेद्य तसंच महाभयंकर किल्ला (स्नश्ाह्मद्वद्बस्त्रड्डड्ढद्यद्ग स्नश्ाह्मह्ल) म्हणून या किल्ल्याचं वर्णन ठाणे जिल्हा गॅझेटियरमधे सापडतं.

१८१८ मधे कॅप्टन डिकन्सन नामक इंग्रज अधिकारी माहुलीवर आला. त्याने स्वत: फिरून माहुलीचं सवेर्क्षण केलं. सन १८१८ मधील कॅप्टन डिकिन्सनच्या भेटीपर्यंत गडावरील काही वास्तू शाबूत होत्या. मात्र १८६२ च्या आसपास किल्ल्याचं आणखी नुकसान झालं आणि किल्ल्यावरची तटबंदी जवळपास नष्ट झाली. माहुलीच्या दक्षिणेकडील एका घळीत एक दरीच्या तोंडाशी एक वैशिष्ट्यपूर्ण तुरुंग असल्याचं गॅझेटिअरमधे म्हटलं आहे.

शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या उपस्थित रायगडावर झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रं आणि किल्ल्यांवरील पाण्याने महाराजांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ३०० हून अधिक तीर्थक्षेत्रं आणि किल्ल्यांवरून आणलेल्या पाण्याचे कुंभ रायगडावर आणले होते. राजांच्या समाधीवर अभिषिक्त होण्याचा पहिला मान होता तुळजापूरहून आणलेल्या जलकुंभाचा. त्यानंतर शिवनेरी आणि त्यानंतर महाराजांचं बालपण पाहिलेल्या माहुलीच्या गडगंगेला तिसरं मानाचं पान देऊन गौरवण्यात आलं होतं.

माहुलीवर आढळणारे घरांचे प्रशस्त चौथरे, तलाव तसंच मानवी वस्तीच्या खाणखुणा पाहत एकेकाळी या किल्ल्यावर प्रचंड वस्ती असावी. मात्र आता किल्ल्यावर उरले आहेत काही वीरगळ, भग्न तटबंदी, दगडधोंडे, चौथरे आणि मानवी वस्तीच्या खुणा दर्शवणारी आंबा, फणस, बकुळीची झाडं…

रवींद पानसरे

original at – http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4048980.cms

var zz=0;var sldsh=0; var bellyaddiv = ‘

‘; var charcount = 150; if(navigator.appName == ‘Microsoft Internet Explorer’){ charcount = 150; }else{charcount = 230;} var stindex=100; var stp=charcount; var taglen=0; var tmp; var tagcheck = new Array(“div”,”span”,”br”,”font”,”a”); var storycontent = document.getElementById(“storydiv”).innerHTML; var firstpara = storycontent.substring(0,storycontent.toLowerCase().indexOf(“

“)).toLowerCase(); function findptt(cnt){ zz++; if(zz == 10)return; var xxx=-1,yyy=-1; var ccnt = cnt; for(ii=0; ii “); if(yyy != -1){ taglen += yyy; stp = stp + yyy; yyy+=1; } taglen = taglen + tagcheck[ii].length + 3; break; } } if(xxx == -1 xxx >= charcount){ return; }else{ var tmp2 = ccnt.substring(0,xxx); tmp2 += ccnt.substring((yyy+xxx),ccnt.length); findptt(tmp2); } }findptt(firstpara); if(firstpara.length <= taglen + charcount){ stp = firstpara.length; } var tmpminus=0; var tmpcon = storycontent.substring(0,stp); if(tmpcon.lastIndexOf("<") “)){ }else{ tmpminus = tmpcon.length – tmpcon.lastIndexOf(“<"); } stp = stp – tmpminus; tmpcon = storycontent.substring(0,stp) + bellyaddiv + storycontent.substring(stp,storycontent.length); if(sldsh == 0 && doweshowbellyad != 1){}else{ document.getElementById("storydiv").innerHTML = tmpcon; }
var RN = new String (Math.random()); var RNS = RN.substring (2,11); var b2 = ‘http://adstil.indiatimes.com/RealMedia/ads/adstream_sx.ads/www.maharashtratimes.indiatimes.com/MTHFI_Stories/index.html/1'+RNS+'@Right3?‘; if (doweshowbellyad==1) bellyad.innerHTML = b2;


शांततेचा निवारा

शांत आणि खळखळ नाद करत जाणारी नदी हे खडावलीचं मुख्य आकर्षण. नदीचा मंद खळखळाट आणि गार वाऱ्याची झुळूक मनाला उभारी देते. ठाण्यापासून एक तासाच्या अंतरावर असलेलं ‘खडावली’ गाव रूटीनला कंटाळलेल्या मंडळींसाठी चांगला पिकनिक स्पॉट आहे.
…….

‘ जिथे शांतता निवारा शोधत येते

अशा एका तळ्याकाठी बसावेसे वाटते! ‘

कवी अनिल यांच्या या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर ठाणे जिल्ह्यातल्या खडावलीला एकदा भेट द्यायलाच हवी. गावातून वाहणारी नदी हे इथलं मुख्य आकर्षण. मंद खळखळाट करत वाहणाऱ्या नदीचं चमचमतं पात्र पाहिलं की एखादी अल्लड लहानगी दुडूदुडू धावत, डोळे मिचकावत आपल्याला बोलावते आहे असं वाटतं. नदीच्या किनारी वाऱ्याची थंड झुळूक स्पर्शून जाते. तिचा स्पर्श आणि नदीचा सूरमयी नाद आपल्याला आकषिर्त करतात. एका क्षणात मनाला आलेला थकवा निघून जातो. मनावर साचलेली धूळ उडून जाते. निसर्गाच्या जादूने आपण मंत्रमुग्ध होतो… रोज ट्रेन पकडायची, गदीर्चे धक्के सहन करायचे… या रूटीनला कंटाळलेल्या मंडळींसाठी ‘रिचार्ज’ होण्यासाठी खडावली हे उत्तम ठिकाण आहे.

पूवीर् या गावात खूप खड्डे होते म्हणून त्याला ‘खड्डावली’ म्हणू लागले. नंतर ते ‘खडावली’ झाल्याचं सांगितलं जातं. इथल्या नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी दूरहून पर्यटक खडावलीला भेट देतात. नदीचा किनारा सोपा असून त्याची रचना सपाट खडकांची आहे. ही नदी शांत आणि उथळ असल्याने मुलांपासून, महिला आणि वृद्ध नदीत डुंबण्याचा आनंद घेऊ शकतात. तसंच किनाऱ्यावर चहा, भजी आणि वडापाव यांची छोटी टपरीवजा दुकानंही आहेत. पाण्यात मनसोक्त डंुबून हुडहुडी भरली की गरमागरम भजी खाण्याचा आणि सोबत कटिंग चहा पिण्याचा आनंद काही निराळाच असतो.

शांत वाहणाऱ्या नदीच्या किनारी स्वामी समर्थांचा सुंदर मठ आहे. इथल्या शांततेवर एक अध्यात्मिक अस्तर असल्यासारखं वाटतं. मठातला गारवा शांतता अधिक गहिरी करतो. टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेतल्यावर अनेक भाविक या मठात येतात. भाविकांना मठात ध्यानधारणा किंवा नामस्मरणही करता येतं. खडावलीच्या वेशीवरच हनुमानाचं मंदिर आहे. हनुमान हे शक्तीचं दैवत असल्याने गावाचं रक्षण करण्यासाठी वेशीवरच हे मंदिर बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं. या परिसरात दत्ताचंही छोटसं, सुंदर मंदिर आहे. हे मंदिरही पाहण्यासारखं आहे.

कसलेल्या गायकाने शांत, मंद गाणं गावं तशी खडावलीची नदी मंजुळ नाद करत वाहत असते… सगळ्या चिंता नदीच्या पात्रात काही वेळापुरत्या सोडून एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणे किनाऱ्यावर बसून राहावं… शांततेचा उपभोग घेत!

……. ………

* इथे कसं पोहोचाल?

खडावली हे मध्य रेल्वेवरचं कसाऱ्याकडे जाताना टिटवाळ्याच्या पुढचं स्टेशन. इथे कसारा किंवा आसनगाव ट्रेनने जाता येतं. वाहनाने जायचं झाल्यास कल्याणहून टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्यावरून खडावलीला जाता येतं.

* काय काळजी घ्याल?

नदीचं पात्र किनाऱ्याजवळ शांत आणि उथळ असलं तरी काही ठिकाणी ते खोल आणि धोकादायक आहे. त्यामुळे पोहण्यासाठी जास्त पुढे जाऊ नये. जायचं झाल्यास तिथल्या जाणकार स्थानिकांचा सल्ला घ्यावा. नदीच्या पाण्याचा आनंद घेताना तिथेच कचरा करू नका. पर्यावरणाचा समतोल राखणं हे आपलं कर्तव्य आहे.


ओढाळ नाणेघाटाचा ट्रेक


कल्याणहून एक रस्ता मुरबाड, टोकवाडी, माळशेज घाट करत नगरला जातो. कल्याणहून साधारण चाळीस-पंचेचाळीस कि.मी.वरचं सरळगाव सोडलं की सगळा मुलुख बदलतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी भाताची शेतं, त्यात विसावलेली घरं हे दृश्य जाऊन निर्जन जंगल दिसू लागतं. बाहेरची विराटता आणि शांतता आपल्याला सगळं विसरायला लावून वेगळ्या प्रदेशात आल्याची जाणीव करून देते. त्यात उजवीकडे दूरवर दिसत असलेल्या सह्यादीच्या बेलाग डोंगररांगा आणि त्यातले काळेकभिन्न कडे आपल्याला होत असलेली जाणीव अधिक ठळक करत जातात.

हा आहे माळशेज घाटाच्या पायथ्याचा वैशाखरे, मोरोशी, सावणेर्चा ठाणे जिल्ह्यातला आदिवासी प्रदेश. या सगळ्यात उजवीकडच्या भल्यामोठ्या डोंगररांगेतून बाहेर आलेला एक मोठा कडा आपली नजर सतत वेधत असतो. विशेष म्हणजे खूप दूर असूनही त्याचं अस्तित्व आपल्याला ठळकपणे जाणवतं. त्याचं हे अस्तित्व नुसतं आकारामुळे नाही तर त्याच्या कित्येक वर्षांच्या अफाट कर्तृत्वामुळे आहे. हा कडा आहे ‘नानाचा अंगठा’ आणि त्याच्या बगलेतला त्यावेळच्या दख्खन पठारावरचा एक प्रमुख व्यापारीमार्ग ‘नाणेघाट’ आणि या दोघांच्याही मागे असलेला त्यांचा रक्षक ‘जीवनधन’ हा किल्ला.

आज या विराट आणि वैराण परिसराला आधुनिक सोयींचा पुसटसाही स्पर्श झाला नसला तरी फार प्राचीन काळापासून या परिसरात मोठ्या उलाढाली होत असल्यामुळे इथे मोठी सुबत्ता नांदत होती. सातवाहनांच्या आणि महाराजांच्या काळातही त्यावेळी जुन्नर ही दख्खनमधली मोठी बाजारपेठ होती. तर सोपारा आणि कल्याण ही नावाजलेली आंतरराष्ट्रीय बंदरं होती. या बंदरावरून उतरलेला सगळा माल नाणेघाटामागेर् देशावरच्या जुन्नरला जात असे. याची साक्ष पटवणाऱ्या अनेक खुणा आज भग्नावस्थेत असल्या तरी नाणेघाटाच्या तोंडावर एक माणूस आत बसू शकेल असा दगडी रांजण आजही इथे आहे. त्याकाळी यात रोजची जकात जमा होत असे.

नाणेघाटाचा ट्रेक हा डोंगरभटक्यांमध्ये अतिशय प्रिय आहे. मुरबाड-सरळगावच्या पुढे ‘टोकावडे’ हे या मार्गावरचं थोडंस मोठं गाव आहे. मात्र नाणेघाटात जाणारी पायवाट याच रस्त्यावरुन तीनेक कि.मी. पुढे गेल्यावर उजवीकडे आहे. याची खूण म्हणजे इथे उजवीकडेच ‘ओतुर ४५’ असा मैलाचा दगड आहे. त्यामुळे बसचं तिकिट वैशाखऱ्याच्या पुढच्या स्टॉपचं म्हणजे मोरोशीचं काढावं. टोकावड्याला बस कण्डक्टरला या जागी बस थांबवण्याची खास विनंती केली की आपली ही तीन कि.मी.ची चाल वाचते.

इथून उजवीकडे तिरकं बघितलं की नानाचा अंगठा समोर दिसतो आणि त्याच्या बाजूला दोन मोठे हाय टेंशन वायरचे टॉवर दिसतात. या टॉवरमधून इलेक्ट्रिक वायर्स खालच्या दरीत आलेल्या दिसतात. वर जाणारी वाट ही या सतत या वायर्सच्या खालून जाते. त्यामुळे उतरल्यावर पहिल्यांदा आपली दिशा निश्चित करण्यासाठी या टॉवर्सचा अंदाज घेतला पाहिजे. कारण वर जाणाऱ्या या वाटेव्यतिरिक्त सगळीकडे ताशीव कडे असल्याने वर जायला दुसरी वाट नाही.

या वाटेवर आल्यानंतर अगदी थोड्याच वेळात दोन वाटा आहेत. यातली एक मळलेली वाट डावीकडे जाते व दुसरी थोडीशी खाली उतरते. इथे मात्र सावध राहून खाली उतरणारी वाट पकडली की आपण सरळ नाणेघाटात पोहोचतो. सगळा रस्ता एकदम रूंद असला तरी दगडधोंड्यांचा आहे. रात्री ट्रेक करायचा असेल तर प्रत्येकाजवळ दोन अधिक सेल्ससह उत्तम विजेरी हवी. रमतगमत वरच्या गुहेपर्यंत जायला अडीच-तीन तास लागतात. बसमधून उतरल्यावर वर पोहोचेपर्यंत वाटेत पाण्याचा एक थेंबही मिळत नाही. पावसाळ्यात मात्र या मार्गावर प्रचंड पाणी वाहत असतं. कोणीही कधीही घसरू शकतो. त्यामुळे सोबत प्रथमोपचाराचं साहित्य असणं जरुरी आहे.

याच नानाच्या अंगठ्याच्या कड्यात मध्यभागी एक मोठी चौकोनी गुहा आहे. यात सहज पंचवीस एकजण मुक्काम करु शकतात. गुहेच्या बाजूलाच पाण्याची पाच-सात टाकं आहेत. इथे बाराही महिने चांगलाच गारवा असतो. त्यात गुहेची जमीन म्हणजे कातळ असल्याने खाली अंथरायला कॅरीमॅट आणि पांघरायला स्लिपिंग बॅग असायला हवी. ही गुहा निर्जन असल्याने मुक्कामी असेल तर बरोबर पातेली, शिधा आणि मेणबत्त्याही हव्यात. मात्र जीवधनचा ट्रेक करायचा असेल तर सगळं सामान सोबत नेणं अत्यंत आवश्यक आहे.

नाणेघाटाच्या डोंगरमाथ्याहून उजवीकडे एक-दीड कि.मी.वर ‘घटघर’ हे छोटंसं खेडं आहे. इथून उजवीकडे साधारण पाऊणेक तास डोंगर चढल्यावर आपण ‘जीवधन’ (समुदसपाटीपासून ३७५४ फूट) या किल्ल्यावर पोचतो. वर डोंगरात पाण्याची टाकी आणि काही डोंगरात खोदलेल्या खोल्या आहेत. डोंगराच्या एका कडेवरून खालच्या बाजूला ‘खडा पारशी’ किंवा स्थानिक भाषेत ‘वांदरलिंगी’ नावाने ओळखला जाणारा प्रचंड सुळका आहे. घाटघरहून वरती जाणारी वाट काही ठिकाणी निमुळती आहे. जीवधनवरून उत्तरेला कळसूबाई, दक्षिणेला भीमाशंकरची पर्वतरांग, ईशान्येला हरिश्चंदगड, वायव्येला माहुलीचा किल्ला तर खालचं नाणेघाटाचं पठार, नानाचा अंगठा असा अतिशय भव्य आणि विराट देखावा दिसतो.

काहीजण याचबरोबर जुन्नरकडे असलेले चावंड, हडसर आणि शेवटी शिवनेरी असाही ट्रेक करतात. घाटघरहून जुन्नरला जायला दिवसातून ठराविक वेळी बसेस आहेत. ज्याने कोणी एकदा का नाणेघटचा हा भन्नाट ट्रेक आणि तिथल्या गुहेत मुक्काम केला की त्याचे सह्यादीतल्या या डोंगराशी ऋणानुबंध होतात. नाणेघाटची गुहा त्याला वारंवार बोलावत राहते. काही जागा असतातचं अशा ओढाळ आणि सह्यादीत तर अशा जागा अगणित आहेत.

भोराईच्या किल्ल्यावर

सह्यादीतल्या किल्ल्यांमध्ये ‘सुधागड’ आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख समर्थपणे टिकवून आहे. फार कमी जणांना हा ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भ माहीत आहे. मराठ्यांच्या राजधानीच्या ठिकाणासाठी महाराजांनी जवळजवळ हे ठिकाण निश्चित केलं होतं. गडावरची विस्तृत सपाटी हे त्यातलं महत्त्वाचं कारण असावं. त्यादृष्टीने त्यावेळच्या प्रमुख विचारवंतांनी या परिसराची कसून पाहणीही केली होती. पण शेवटी निवड झाली ती रायगडाची. त्यावेळची मोगलांबरोबरच्या झगड्याची व्याप्ती लक्षात घेतली तर या ठिकाणचा राजधानी म्हणून केलेला विचारच या ठिकाणाची भौगोलिक समर्थता दाखवतो.

महाराजांच्या अमदानीत १६४८ मध्ये हा किल्ला नारो अप्पाजी यांनी मुघलांकडून जिंकून स्वराज्यात आणला.

या किल्ल्याला आणखी एक ऐतिहासिक संदर्भ आहे. औरंगजेबाच्या मुलाने, शाहजादा अकबरने, बापाशी म्हणजे औरंगजेबाशी फारकत घेऊन मोगलांची छावणी सोडली आणि तो मराठ्यांना येऊन मिळाला. त्यावेळी त्याने याच परिसराचा आसरा घेतला होता. त्याने या गडाच्या धोंडसे आणि नाडसूर परिसरात दीर्घकाळ आपली छावणी टाकली होती. हा परिसर सह्यादीच्या ऐन गाभ्यातला आहे. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचे विश्वासू मिर्झा यहुद्दीन शुजाई, वकील अब्दुल हमीद आणि दुर्गादास राठोड अशी मोगलांच्या बाजूची नामवंत मंडळी होती. ही घटना संभाजीराजांच्या काळातली आहे आणि ही घडामोड या प्रदेशाचं बेलागपण ठसठशीतपणे दाखवते.

या जागेचं आणखी एक महत्त्व म्हणजे भोर संस्थानच्या पंत सचिवांच्या कुलदेवतेचं, भोराईदेवीचं देऊळ गडावर आहे. इथे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी जत्रा भरते. त्यामुळे या किल्ल्याला ‘भोराईचा किल्ला’ असंही म्हटलं जातं. काही ठिकाणी या किल्ल्याचा उल्लेख ‘घेरा सुधागड’ असाही करण्यात आला आहे.

सुधागडच्या डोंगराचा घेर प्रचंड असल्याने पायथ्याचा परिसरही विस्तृत आहे. पायथ्याला नाडसूर, धोंडसे आणि वैतागवाडी अशी तीन गावं आहेत. यातल्या कुठल्याही गावातून गडावर जाता येत असलं तरी वैतागवाडीहून गडाच्या मुख्य वाटेला जाणारी पायवाट बऱ्यापैकी सोयीची आहे. पहिल्या अर्ध्या तासाची सपाटीवरची चाल सोडली तर गडापर्यंत जाणारी वाट गर्द रानातून जाते. मधला अर्ध्याएक तासाचा टप्पा प्रचंड दगडधोंड्यांचा आहे. साधारण पाऊण टप्पा पार केला की वाटेच्या बाजूलाच डावीकडे पाण्याची टाकी आहे. इथे कातळात कोरलेली ‘बहिरोबा’ची प्रतिमा आहे.

गडावर रमतगमत जायला अडीच ते तीन तास लागतात. सगळा चढ अजिबात अंगावर येणारा नाही. गडाच्या सगळ्या उतारांवर प्रचंड रान असून यात भेकरं, कोल्हे, माकडं आणि तुरळक प्रमाणात अस्वलंही आहेत.

गडावर प्रचंड मोठी सपाटी असून या सपाटीवर मध्येमध्ये दाट जंगलाचे पुंजके आहेत. गडमाथ्यावर मोकळ्या जागेत भोराईदेवीचं चांगलंच मोठं आणि बऱ्यापैकी स्थितीत असलेलं देऊळ आहे. देवळाच्या गाभाऱ्याबाहेरच्या मंडपात पंचवीसेक जण सहज मुक्काम करू शकतात. बाहेरच्या पटांगणात शेकोटीभोवती बसून मोकळ्या वाऱ्यात गप्पाही मारता येतात. देवळापासून पाच मिनिटं चालत जाण्याच्या अंतरावर पण गर्द झाडीत पंतप्रतिनिधींचा त्यावेळी बांधलेला मोठा वाडा आहे. आता हा वाडा पडक्या स्थितीत असला तरी त्याच्या ओसरीत पंचवीसेक जण सहज राहू शकतात. वाड्याला मोठं कूस असल्याने सुरक्षितही वाटतं. या दोन्ही ठिकाणांपासून पाच ते दहा मिनिटांवर एक मोठं तळं आहे. पण इथलं पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे इथे मुक्काम करायचा असल्यास सोबत पिण्याच्या पाण्याचा भरपूर साठा हवाच.

गडाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरपूर प्रमाणावर साप आहेत. इतके की इथे परंपरेने ‘अजिबात नांगरट करायची नाही’, असा जणू अलिखित नियमच आहे. जो इथे नांगरट करेल त्याचा निर्वंश होईल, असा इथल्या स्थानिकांचा समज आहे. त्यामुळे रात्रीच्या शेकोटीसाठी किंवा जेवणासाठीचा लाकूडफाटा दिवसाच्या उजेडातच करावा. मुक्कामाच्या जागेची, त्यातही कोपऱ्यांची काटेकोरपणे तपासणी करून मगच तिथे राहावं.

नाडसूरला जाण्यासाठी ठाण्याहून सकाळी थेट बस आहे. याव्यतिरिक्त पालीहून बसने किंवा सहा आसनी रिक्षाने जाता येतं. गडावर लोणावळा-आंबवणे, तैलबैला करत ‘वझरी’च्या खिंडीतून नाडसूर गाठता येतं. तसं मुळशी-पवना खोऱ्यातल्या जंगलातूनही हा परिसर गाठता येतो. मागतले इथले काही विस्तृत प्रदेश आजही निर्जन असल्याने अत्यंत माहितगार असणारा स्थानिक सोबत असणं आवश्यक आहे

रिफ्रेशिंग अर्नाळा

:

ठाणे जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर अनेक पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल होतायत. कमीतकमी वेळात फिरण्याची ठिकाणं भटकंतीप्रेमींना हवीच असतात. त्याच लिस्टमधलं रिफ्रेश करणारं ठिकाण म्हणून अर्नाळ्याचं नाव आहे. होडीतला आनंद, बिचवरची मजा, ऐतिहासिक वास्तू, तसंच मासेखाऊंसाठी मेजवानीचं ठिकाण म्हणजे अर्नाळा.

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतून उमग पावलेली वैतारणा नदी याच अर्नाळा किल्ल्याच्या खाडीमुखाशी मिळते. इथे वैतरणा खाडीमुखाशी भर सागराच्या कुशीत वसलेल्या या अर्नाळा किल्ल्याने आपलं स्वतंत्र अस्तित्व जपलंय.

अर्नाळा गाठायला पश्चिम रेल्वेचं विरार रेल्वे स्टेशनवर जायचं. विरारपासून १४ किमीवर अर्नाळा कोळीवाडा आहे. तिथे बससेवा चांगली आहे. किंवा वसईहूनही अर्नाळ्याला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसेस आहेत.

अर्नाळा बस स्थानक ऐन बाजारपेठेत असल्याने खाण्याची उत्तम सोय होते. बाजारातून मासळीचा वास घेत किनारा गाठायचा. किनाऱ्यावर कोळणी मासे विकताना, तर पुरुष कावड घेऊन बर्फ, मच्छीची वाहतूक करताना दिसतात.

किनाऱ्यावरून अर्नाळा बेटावर जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला फेरी बोट उपलब्ध आहे. साधारण पंधरा-वीस मिनिटात अर्नाळा बेट गाठता येतं. संपूर्ण नारळाच्या झाडांनी हे बेट व्यापलेलं आहे. बेटाच्या पश्चिम टोकावर किल्ला असल्याने भर वस्तीच्या बोळातून किल्ला गाठायचा. वाटेतच कोळ्यांची जाळी, होडीचे नांगर, सुकत टाकलेली मच्छी, खार लावलेली मच्छी असे अनेक प्रकार पाहायला मिळतात.

अर्नाळा किल्ल्याचं भक्कम प्रवेशद्वार पाहून किल्ल्याच्या बांधकामाची कल्पना येते. या महाद्वारावर व्यास किंवा व्याघ्य्र आणि हत्ती यांची सुबक शिल्पं कोरलेली आहेत. समोरच्याच कमानीवर वेली-फुलांची बुट्टी आपल्याला खिळवून ठेवते. उत्तराभिमुख असलेल्या या प्रवेशद्वारावर देवनागरीमधे शके १६५९ मधला शिलालेख लिहिलेला आहे. इथून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. उजव्या हातालाच साधारण दहा फुटांवर छोटी देवडी दिसते. ही देवडी थेट प्रवेशद्वारावरील तटरक्षकांच्या इथे मिळते. संरक्षणाच्या योजनेचा एक मोठा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो.

मुख्य गडात प्रवेश केल्यावर समोरच प्रशस्त शेती दिसते. या आखीव शेतीमुळेच गडाचं रूप खुलून दिसतं. सरळ पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला कौलारू घरासारखा दर्गा आहे. तर डाव्या हाताने चालत गेल्यास पूवेर्च्या तटाजवळ त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच टुमदार वटवृक्ष असल्याने इथे थोडा वेळ बसून विश्रांती घ्यायला हरकत नाही. इथे समोर गोड्या पाण्याचा तलाव बांधून घेतलेला आहे. तर तटांवर उत्खननात सापडलेल्या गणेशाच्या मूतीर्ची स्थापना केलेली आहे. इथूनच मागे वळून तटाच्या आतील बाजूने तटांवर जाण्यास पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी तटांवरच्या फेरीस सुरुवात करायची. एकूण नऊ बुुरूज असलेला आणि तीन प्रवेशद्वार असलेला हा किल्ला इतिहासात स्वत:च वेगळं अस्तित्व ठेवून आहे.

या जलदुर्गाची उभारणी गुजरातच्या सुलतानाने इ.स. १५१६ मधे केली. पुढे १५३० मधे हा किल्ला पोर्तुगिजांनी आणि त्यानंतर १७३७ मधे मराठ्यांनी जिंकला. या जलदुर्गाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी दोन हजारी सैन्य गडावर ठेवलं होतं. असे दाखले इतिहासात सापडतात. बेटावर असलेल्या कालिका मातेचं दर्शन घायचं आणि पुन्हा किनारा गाठायचा.

निसर्गाच्या सान्निध्यातले दोन दिवस घालवून नव्या जोमाने कामाला लागू शकतो.

var zz=0;var sldsh=0; var bellyaddiv = ‘

‘; var charcount = 150; if(navigator.appName == ‘Microsoft Internet Explorer’){ charcount = 150; }else{charcount = 230;} var stindex=100; var stp=charcount; var taglen=0; var tmp; var tagcheck = new Array(“div”,”span”,”br”,”font”,”a”); var storycontent = document.getElementById(“storydiv”).innerHTML; var firstpara = storycontent.substring(0,storycontent.toLowerCase().indexOf(“

“)).toLowerCase(); function findptt(cnt){ zz++; if(zz == 10)return; var xxx=-1,yyy=-1; var ccnt = cnt; for(ii=0; ii “); if(yyy != -1){ taglen += yyy; stp = stp + yyy; yyy+=1; } taglen = taglen + tagcheck[ii].length + 3; break; } } if(xxx == -1 xxx >= charcount){ return; }else{ var tmp2 = ccnt.substring(0,xxx); tmp2 += ccnt.substring((yyy+xxx),ccnt.length); findptt(tmp2); } }findptt(firstpara); if(firstpara.length <= taglen + charcount){ stp = firstpara.length; } var tmpminus=0; var tmpcon = storycontent.substring(0,stp); if(tmpcon.lastIndexOf("<") “)){ }else{ tmpminus = tmpcon.length – tmpcon.lastIndexOf(“<"); } stp = stp – tmpminus; tmpcon = storycontent.substring(0,stp) + bellyaddiv + storycontent.substring(stp,storycontent.length); if(sldsh == 0 && doweshowbellyad != 1){}else{ document.getElementById("storydiv").innerHTML = tmpcon; }
var RN = new String (Math.random()); var RNS = RN.substring (2,11); var b2 = ‘http://adstil.indiatimes.com/RealMedia/ads/adstream_sx.ads/www.maharashtratimes.indiatimes.com/MTHFI_Stories/index.html/1'+RNS+'@Right3?‘; if (doweshowbellyad==1) bellyad.innerHTML = b2;

निसर्गराजा, ऐक सांगतो!


पावसाळा सुरू झाला की निसर्गवेड्यांना वेध लागतात ते वीकएण्ड पिकनिक्सचे. प्रत्येकातच एक निसर्गवेडा लपलेला असतो. शहरातल्या धकाधकीच्या आयुष्यात आपली नेहमीची कामं सोडून वारंवार निसर्गाशी गळाभेट घेता येत नाही. पण पावसाळ्यात मात्र निसर्गाला उराउरी भेटण्यावाचून पर्यायच उरत नाही. लोणावळ्यासारख्या टिपिकल पावसाळी ठिकाणी जाणारे फॅमिली टुरिस्ट असोत किंवा डोंगराच्या कडेकपाऱ्यांमध्ये निसर्गाच्या हिरव्या दुलईवरून मुक्तपणे फिरणारे भटके असोत, पावसाळा आला की स्वत:च्याही नकळत झपाटल्याप्रमाणे निसर्गाच्या कुशीत शिरायला आपण आतूर होतो.

हल्ली त्याच त्याच ठिकाणी जाण्यापेक्षा नवी ठिकाणं शोधण्याकडे कल जास्त आहे. लोणावळ्यासारख्या ठिकाणी भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पाण्यापेक्षा माणसंच अधिक असतात. काही वर्षांपूवीर् याचा उबग येऊन अशाच काही भटक्यांनी अॅम्बी व्हॅलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराच्या कुशीत दडलेला एक अप्रतिम धबधबा शोधून काढला. आता मात्र भुशी डॅम इतकीच या धबधब्यावरही गदीर् उसळलेली असते. शिवाय, दारूड्या पर्यटकांचा त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळेच लोणावळा, माळशेज घाट यांसारखी दृष्ट लावणारी ठिकाणं फॅमिली टुरिस्टना नकोशी झाली आहेत. शिवाय, ट्रेकर मंडळींनाही या ठिकाणांचं फार आकर्षण राहिलेलं नाही.

लोणावळ्याच्या तुलनेत खंडाळा मात्र अजूनही पर्यटकांच्या गदीर्पासून काहीसा लांब आहे. पर्यटकांपेक्षा ट्रेकर्सचा ओढा खंडाळ्याकडे जास्त आहे, तो इथले हिरवेगार डोंगर आणि इथल्या प्रख्यात ड्युक्स नोजमुळं. रेल्वे ट्रॅक सोडून हिरवीकंच वस्त्र ल्यालेल्या डोंगराच्या कुशीत शिरलं की, बाहेरच्या जगाची कणमात्र आठवण राहात नाही. आपल्या खांद्यापर्यंत उतरलेले ढग, सतत रिपरिपणारा पाऊस, थंडगार हवा, जिकडे पाहावं तिकडे हिरवाईचं साम्राज्य… निसर्ग असा मोकाट सुटलेला असतो की त्याचं हे मुक्त बागडणं बघून आपल्याही मनात हर्ष दाटून येतो. शहरात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटणारे आपण तिकडे मात्र निसर्गाचा हात पकडून तो नेईल तिथे त्याच्याबरोबर जातो.

खंडाळ्यापर्यंत जायची इच्छा नसेल तर त्याच्या अलीकडेही काही चांगली ठिकाणं आहेत, जी अजून तरी पर्यटकांच्या गदीर्पासून लांब आहेत. नेरळला उतरायचं ते माथेरानला जाण्यासाठीच. माथेरानचा पाऊस ही खास अनुभवण्यासारखी चीज आहेच; पण माथेरानपर्यंत पोहोचायच्या आधी स्टेशनपासून १५ मिनिटांवरच भान हरवायला अनुभव देणारं ठिकाण आहे ते म्हणजे टपालवाडी. स्टेशनला उतरून रस्त्यानं माथेरानच्या दिशेने पायी निघालं की, १० मिनिटांत उजव्या हाताला एक तलाव लागतो. या तलावावरून पुढे चालत गेलं की सामोरा येतो तो टपालवाडीचा धबधबा. हा सर्व परिसरच तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. शुद्ध हवा, नजर पोहोचेल तिथवर हिरवं साम्राज्य, आकाशातून सुरू असलेला पावसाचा अभिषेक आणि शुभ्र दुधासारखा वाहणारा धबधबा आणि हे सर्व ठाण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावर.

असंच एक ठिकाण कर्जतला आहे. त्याचं नाव आहे कोंडाणा केव्ज. राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या या बौद्धकालीन गुंफा अतिशय देखण्या आहेत. कर्जत स्टेशनला उतरून एसटी किंवा सहा आसनी रिक्षाने कोंदिवडे गावाला उतरलं की तिथून पायी चालत तासाभरात या गुंफापाशी पोहोचता येतं. इथूनच पुढे राजमाचीला जायचा रस्ता आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या आणि पहिल्या शतकातल्या या गुंफा काळाचे घाव सोसत अजूनही उभ्या आहेत. एक चैत्यस्तूप आणि सात विहार यांचा समावेश असलेल्या या गुंफातील कोरीवकाम दृष्ट लागण्यासारखं आहे.

ज्यांना डोंगरदऱ्यांत भटकण्याची हौस नसेल त्यांच्यासाठी मुंबई-ठाण्याच्या आसपास अनेक समुदकिनारे आहेत. अलिबागच्या समुदकिनाऱ्यावरही माणसांची गदीर् उसळलेली असते. पण अलिबागला लागूनच असलेले आक्षी, नागाव आणि रेवदंड्याच्या किनाऱ्यांवर मात्र तुलनेने कमी गदीर् असते. वरून कोसळणारा पाऊस आणि समोर उधाणलेला समुद हे दृष्य मन मोहून टाकणारं आणि चित्तवृत्ती भारणारं आहे. रेवदंड्याच्याच पुढे कोरलईचा किल्लाही पाहण्यासारखा आहे. या किल्ल्यावरून अलिबागपर्यंतचा समुदकिनारा दृष्टीपथात येतो. इथेच दीपस्तंभही आहे. मात्र, या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यामुळे जेमतेम मोटारसायकली इथे जाऊ शकतात.

ठाणे जिल्ह्यात डहाणू, बोडीर्चा समुद वीकएण्ड पर्यटनासाठी आदर्श आहे. डहाणू हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील विभाग म्हणून घोषित करण्यात आला असल्यामुळे इथे एखाद दोन अपवाद वगळता मोठे उद्योग नाहीत. त्यामुळे इथला निसर्गरम्य परिसर अद्यापि टिकून आहे. पालघर, सफाळे, डहाणू, बोडीर् हा सारा परिसर म्हणजे निसर्गाची खाण आहे.

या शिवाय, ठाणे जिल्ह्याचं महाबळेश्वर म्हणून ख्यातकीर्त असलेलं जव्हार हेही वीकएण्ड पिकनिकसाठी आदर्श ठिकाण आहे.

original at – http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/3127845.cms

dahanu @ http://www.sawefarm.com/dahanu.html


A journey to Dahanu, a small sleepy coastal town on the shores of Arabian Sea will take you away from the hustle and bustle of the city life in the arms of nature.

Discover Dahanu with ‘Tarpa Gholvad’!

Located between majestic hills and vast expanses of the Arabian Sea, Dahanu lies only on three hours journey from Mumbai, Surat and Nashik. Well connected by Western Railway and National Highway No.8, Dahanu also has good road networks with public transport facilities joining distant places as far as Pune, Thane, Kolhapur, Shirdi and many other cities in Maharashtra.History :
The Dahanu FortDahanu’s historical significance can be traced back to around 1500 AD. Dahanu finds place in the trade map of the east, prepared by Sir Hamilton during the beginning of the 18th century. Dahanu has also been described in 1882 under the title of “Places of Interest in Thane,” as a fort and a seaport. “Dahanuka” also occurs in one of the Nashik cave inscriptions.Geography :

Dahanu, also the headquarters of Dahanu Taluka of Thane District lies in the Northern Konkan region of Maharashtra state. The taluka can be divided into two regions; east, i.e. the junglepatti, which is the forest-clad hilly tribal interior and the west, the bandarpatti (the sea-coast).View of Mahalaxmi mountain Culture :

Dahanu has a conglomeration of people from almost all walks of life. Dahanu also has many temples like the Mahalaksmi Temple, the Santoshi Mata Temple, the Sai-Baba Temple, the Hanuman Temple, etc. apart from Jain Temples and also has Mosques, Churches, a Gurudwara and a Fire-Temple. You will also find Warli places of worship. Dahanu, since ages has distinctly been identified with Warlis and Zoroastrians.

The Warlis : The Warlis, an indigenous tribe, is often referred as the ‘King of the Jungle’, because of their legendary identification with forest. Their houses are made using ‘karvi’ or ‘kasar’ grass walls covered with a paste of red mud and cow-dung. The floor is too made of mud and cow-dung mixture. To protect the earthen wall coat from heavy rains, the thatched roof is four way sloping. Most of the Warlis work as farm labours for their livelihood and cultivate paddy during monsoons. Government support and contribution of various NGOs have given a lift to the Warli’s standard of living and have created awareness about health and hygiene amongst them.

Warli ArtThe Warli Art has also gained world-wide reputation of late, with many local Warlis taking part in out-country exhibitions. Painted in white on a brown earthy surface with basic geometric figures viz. the square, the triangle and the circle, the Warli paintings depict their way of life, their rituals and customs.

A Zoroastrian youthThe Zoroastrians : Progressive in their attitude, the Zoroastrians (also known as Parsis), have played a key role in shaping Dahanu’s destiny. These Iranian refugees had spend almost 12 years of their most trying moments in the caves of Bahrot Hill, for protecting their sacred fire. They tilled the soil Dahanu and turned this town green with vegetable, fruit and flower gardens. Their culture and cuisine have added a unique Persian flavour to the land.Economy :

The Chikoo fruit The social mosaic of Dahanu is dotted with agriculturists, artisans, potters, basket weavers, jewelry die-makers, salt manufacturers, balloon manufactures, toddy tappers and fisher folks.Sipping Coconut water

Dahanu is lined with fruit orchards and is distinctively famous for its Chikoo (Sapota/Sapodilla) fruit. Till date, the economy of Dahanu survives on its chikoo plantations. Chikoo finds its market all the way up to Mumbai, Delhi, Jaipur, Udaipur and Pune with new areas being regularly tapped.

The Fishing boatsDahanu’s rich marine belt has vast wetlands. Fishing in these wetlands is an age-old occupation which sustains thousands of fishermen families. Yet another occupation which supports a sizable population of Dahanu is salt manufacturing in wet lands.

Dahanu forestsDahanu Taluka has one of the largest areas under forests in Thane district. Apart from firewood, this forest yields many a products like teak, ain, khair, hed, bibla, shisham, sawar, apta, kalamb, palas, karvi, bamboo, shikakai, mohuwa, bel, tad, chilhar, palm, charcoal, honey, gum etc. and has a recorded data of more than 100 varieties of trees & plants apart from shrubs, herbs, grass and medicinal plants as well as wild birds & wild animals.Outdoors :

The Tandulwadi Fort For the sport enthusiasts, Dahanu could be a within reach ideal camping destination. Trekking and Venturing out into the surrounding mountains of Bahrot (1,760 ft), Mahalaxmi (1,540 ft), Gambhirgad (2,270 ft) and Asherigad (1,680 ft) could prove a paradise for trekkers. Though there is no professional trekker’s club here, it would not be difficult to find some one to accompany you, if you ask for!

explore our dahanu to world….

 
Suggest Your Dream Place in Dahanu

Hi Friends,

Thank you for visiting http://dahanudrashan.blogspot.com/ This is one of the premiere place that is totally dedicated to tourism near dahanu area. The vital motto of this blog is to provide a genuine information about the known and unknown places near the Dahanu (rural thane).

Here, we have covered many places that includes various temples, picnic spots, hill-stations and forts. Shortly, we will be providing the information about various picnic spots nearby. there might be some places left which are equally beautiful and worth to visit. This may include a particular temple or fort you have visited, a picnic spot you enjoyed or a hill station whose remembrance only gives you a marvelous feelings. You may like to share your experience with the world. Or you may like to provide the information about your private holiday resort. Here is a chance for you to add your dream place and share the experiences and moments where your feelings are associated.

What you have to do is just to provide a brief write-up about the places, a way to reach the destination and the social and historical importance of the place. If possible, send us the photographs of the place. If the information you provide is really worth to add, then we will definitely add your dream place in http://dahanudrashan.blogspot.com/ featuring your name.

Why to wait ? Hurry up !   

Choose your destination and let the world know about it.

dahanu @ holiday iq

<!–

–>

Sightseeing Highlights:

The only thing to do here is to visit the beach and enjoy the sea. The waves are calm and have no undercurrents. The beach is extremely broad during low tide and you can also go for long walks or play volleyball and football on the sands. Building sandcastles and collecting sea shells are another way of wiling away your time. 

Other Activities:

One can also visit Udwada, which is known as the ‘Mecca of the Zoroastrians? where there is a large, beautiful temple that houses their sacred fire. But only Parsis are allowed to enter here. Shopping specialty are the chikoos when in season.

Located in the Thane district, about 145 kms from Mumbai, is Dahanu. It is a quiet seaside town with a sprawling, uncluttered beach. The entire beach stretch is about 17 kms, lined with casuarinas trees. The Dahanu village is mainly a fishing community. The entire stretch also has fruit orchards and is famous for its chickoos. According to stories, this area was once a barren and isolated stretch, until the Iranis came here and inhabited it. Now it has many stately Parsi mansions and holiday homes. 

more about Dahanu »

Dahanu-Bordi Beach

Dahanu-Bordi Beach

Welcome to . . Bordi, Dist. Thane

If  there is a concentration of good beaches down the coast, there are also a few in the north towards Gujarat. Fringed with casuarinas, Bordi is a very safe beach where the water for half a kilometre does not rise above the waist. The entire stretch of 17 km from Dhanu to Bordi is scenic with a backdrop of orchards of various fruits, especially chikoos. 

Besides the MTDC resort, there are quite a few hotels near the beach and one can also get accommodation in spacious Parsee bungalows on the beach. An ideal place to unwind as there is nothing much by way of tourist attraction besides the sand and the sea.
 

  Getting there

By Road : By road, the distance is 145 km.
By Rail : Bordi is also a station on the Western Railway, while the major station is Dhanu 15 km from Bordi.
By Air : Mumbai

  Places to see near by

 Bassien Fort
 Kelva Beach
 Mumbai
 Vasai