Our culture & festivals


We are here to preserve our culture. As current life style & many people’s are relocated in different cities our traditional things are slowly vanishing. We will be sharing the our “paramparik chali riti” so new generation can easily understand about our culture.
Also according to current life style & to suite our young generation life style we propose few changes ensuring “to preserve our culture long life, instead vanishing it by outdated methods”. Hope this will help us to give new look & long life even in cities to our tribal culture.
As cultural activities will be differ by localities. Initially we will be share information about all localities starting from Dahanu from thane district. So requesting you to send information about cultural activities in your area. So commonly we can know tribal culture.

AYUSH culture team crations

Birsa Munda Jayanti

पितर बारस

पितर बारस
पितर बारस हा उत्सव भाद्रपद काळोखि बारसिला होत असतो. हा उत्सव कौटुम्बिक कुलदेवतन्च्या वार्षिक पुजनाचा दिवस समजला जातो. ठाणे जिल्ह्यातिल डहणु तालुक्यातिल महालक्ष्मि मन्दिरातिल अदिवसि समाजाचे पुजारि देवस्थानावर बारषिच्या दिवशि फडाचि देवि, हिमाई, भराडि, बसेरा ह्या देविच्या पुजा स्थानिक सातवी कुटुम्बातिल लोक करित असतात. सम्पुर्ण ठाणे जिल्ह्यातुन आदिवसि लोक तारपि घेउन येतात आणि रात्रभर देवळाच्या चारहि बाजुला तारपा नाचाचि पेरणे (फेरे) धरतात. रात्रभर स्त्रि पुरुष तारपा नाच नाचत असतात. पितर बरसि हा सर्वजनिक उत्सव आदिवसि व बिगर आदिवसि लाखोन्च्या सन्खेने उपस्तित रहुन करतात.


Now, send attachments up to 25MB with Yahoo! India Mail. Learn how.

४. नवा भात खाने (नवखाने)

भाद्रपद
४. नवा भात खाने (नवखाने)
ह आदिवसीचा पारम्परिक सण आहे. पुर्वी काळि कुडई कलीव, दुल्हा अशा प्रकरच्या भाताच्या जाति तिन महिन्यात म्हन्जे भाद्रपद महिन्यात तयार होत असत. यच्यातिल काही जाति आज अस्तित्वत नाहित. भात तयार झले कि भद्रपदातिल एखद्या मन्गलवारि किवा सोयिच्या वारि तयार झलेले भात कापुन घरि आनुन भाताचि पुजा करुन मग मळनि करतात. सन्ध्याकाळि त्या भाताचे पोहे व जेवण करतात. नव्या भाता सोबत नव्या भाज्या पहिजेत म्हनुन आळुचे देठ, माठ, दान्गर, मासे, खेकडे, अशी भजि करुन रात्रि कुलदैवत हिरवा देवाला दिवा लाउन सर्व लहन मोठि मन्डळि एकत्र बसतात. एक वडिल मणूस ताटात पोहे घेउन सर्व मन्डलिन्च्या हातावर पोहे देतो. सर्वाना पोहे वाटल्या नन्तर वाटनारा माणुस सर्वाना उद्देशुन पुरले कि नहि विचारतो. जमलेल्या मणसाकडुन हो पुरले असा जाब अल्यावर वाटनारा सान्गतो, “आपल्या कष्टची नवि कणसरी अथा सगलि जना खा.” नवा भात {पोहे} खातान एक मेकाना भेटतात व वडिलधारया मणसान्च्या पाया पडतात. नन्तर दारु सोबत नवभजिचा चाखना करुन वडील मन्डळि दारु पिवुन झाल्यावर जेवण करतात. जेवण झाल्यावर कधि कधि कामडि नाच, तर कधि तारपा नाच करुन नव्यभाताच्या पिकाचा, नव्या सणाचा आनन्द साजरा करतात.

३. नागपचवी (नाग पन्चमी)

श्रावण
३. नागपचवी (नागपंचमी)
नागपंचमी हा श्रावण शुध्द पंचमी या दिवशी साजरा करतात. या दिवशी शेतकरी नागर्नीचे काम करित नाहि. या दिवशी उपवास करतात. जंगलात नागाच्या ठिकाणी (बिळाजवळ) अदिवसी पुरुष दुध व ज्वारिची फुले (लाह्या भुरुन्गल्या) वहुन पुजा करतात. महिला आणि कुमारिका रात्रि घरि पाटावर तिळ, तान्दुळ, उडिद यांचे नवु नाग करुन गोडेतेलचा दिवा लावुन थेरडा, गोमेठी, करटोल, शिरोळी अश्या वेलि, वन्स्पति, ज्वरिची फुले व दुध वहुन नाग देवताचि पुजा करतात. काहि भगात उपवास करणाऱ्या बाया घरोघरि जावून एकमेकान भेटतात, मोठ्यांचे आशिर्वाद घेतात. व आपल्या कडिल ज्वारीची फुले (लाह्या) त्यांना देतात. भाऊ आणि बहिनि भेटतात, ह्या सनाला बहिणिने भावाकरता उपवास असेहि मानले जाते. रात्रि जेवन झाल्यवर गौरि नाचायला सुरवात होते. रात्रभर ढोलकिच्या तलावर पायाला घुंगरू बांधून स्रि-पुरुष मुले-मुलि नाचत असतात. या दिवसा पसुन गौरि नाचायला सुरवात होते. अशा प्रकारे नागपंचमी हा सण सजरा करतात.

२. कोळीभाजी –

२. कोळीभाजी –
कोळिभजीचा सण जेठ महिन्यात साजरा करतात. पाऊस पडल्या नंतर कोळिभाजी निघाली की, गावकरी एकत्र जमून वर्गणी जमा करतात. आणि मंगळवारी वाघोबाच्या स्थानाजवळ एकत्र जमून गावच्या भगता कडुन (गाव पुजारि) देवाला सेंदूर लावतात आणि कोळी भाजी ठेवतात. नंतर नारळ फोडुन कोंबडा किवा बकऱ्याचा बळि देतात. देवाला धार देवून प्रार्थना केलि जाते कि, “हे गाव देवी-वाघोबा देवा चार महिन्यांचे रात आलि आहे, आमची पोरटोर, गुरढोर. किड्या -कट्यात फिरतील ति तुझ्या ताब्यात ठेव. शेतात चांगले पिक येवू दे, रोगराई पासून गावाचे रक्षण कर. तुला येत्या मार्गशीष साथ भरुन तुझा नवस फेडु” असा सवाल करुन जमलेले गावकरी नारळ व कापलेल्या कोंबड्या, बकऱ्याचा प्रसाद करुन वाटुन खातात. तसेच गावातील पाड्या पाड्यावर , घरा घरात सर्व लोक आपापल्या कुलदेवला दिवा लावून शेतावरच्या देवाला सेंदूर लावून सर्व कुटुंबातील माणसे एकत्र बसून कोळि भाजि खाण्याचा कार्यक्रम करतात. कुटुंबातील वयस्कर व्याक्ति हातात कोळिभाजी देवून. सर्वाच्या हातावर कोळिभाजी देवून, सर्वाना उदेशून म्हणतो, चार महिन्याची रात आलेली आहे, कोणि भांडण तंटा करु नका. शेतिचि चांगली लागवड करा. सुख दुखाला एक मेकांना मदत करा. असा बजावतात आता सगली कोळी खा असा सर्वाना आदेश देतो.
वडील व्यक्तिचा अदेश होताच बाया सर्व मंडळी पाया पडतात, भेटतात आणि सार्वजन कोळी भाजी खातात. वयस्कर स्त्रि-पुरुष दारु पितात व एकत्र बसून जेवन करतात. जेवन झल्यावर कामड नाच सुरु करतात. या दिवसा कामडि नचाला सुरुवात होते. या कोळिच्या सणाला नवीन लग्न करुन दिलेल्या मुलीना व जावयांना खास मुळ (आमंत्रण) करुन बोलावले जाते. अशा प्रकारे कोळी सण साजरा केला जातो.

१. आखातीचा सण

वैशाख
१. आखातीचा सण
वर्षाच्या सुरवतीचा सण म्हणजे अखातीचा सण होय. हा सण बहुतेक कोकण समाजात साजरा केला जातो. वैशाख शुध्द प्रतिपदे पासुन कोरया टोपलित अठरा प्रकारची धान्ये पेरुन त्याची गौरी (लक्ष्मी) म्हणुन पुजा करतात. पेरलेल्या धान्याची रोपे स्त्रिया डोक्यात माळतात. आणि गौराई सारखे फेर धरुन नाच गानी करतात. या दिवशी म्रुत व्यक्तिच्या कावू घास घालतात. अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो.

आपले सन आणि आपले उत्सव

आपले सन आणि आपले उत्सव
१ कोळी भाजी
२ नागपन्चमि
३ पोळा
४ गौरि गणपति
५ साकर चवुत
६ नवभात खाने (नवखने)
७ सर्व पितरि अवास/ओमस्या
८ दिवाळ बारस / वाघ बारस
९ दसरा
१० दिवळि
११ साथिचा देव
१२ सकरात (सन्क्रान्त)
१३ होळी / शीमगा
१४ महाबिज
१५ गुडिपाडवा
१६ आखाति
१७ बोहाडा (गावुत्सव)
१८ खळ्याचा देव

ठाणे जिल्ह्यातील अदिवासी समाजतील देव देवता आणि सणाच्या कार्यपधतीची थोडक्यात महिती.

आदिवसी युवा शक्ति.
ठाणे जिल्ह्यातील अदिवासी समाजतील देव देवता आणि सणाच्या कार्यपधतीची थोडक्यात महिती.

आदिवसी जमतिचे सण हे इन्ग्रजी महिन्या नुसार होत नसुन मराठी महिन्यान्च्या तिथि नुसार होत असतात. ठाणे जिल्ह्यातील आदिवसी जमातीतील होळि (शिमगा) हा वर्षातील सर्वात शेवटच सण मानला जातो व आखातीच सण हा वर्षातील पहिला सण माणला जातो.

अपले नाच –

अपले नाच –
१ ढोल
२ तारपा
३ ढेरा
४ टिपरि
५ टबला
६ धुमशा (तुर)
७ कामडि
८ मान्दोळ
९ गौरि (गवरि)
१० सन्गड नाच
११ रिरेटि
१२ घोरनाच

आपले देव देवता

आपले देव देवता
१ कुलदेवता
हिरवा , चिता, झोटिन्ग, हिमाय, कनसर्या बाळ, बैलचा तान्डा, नरान देव, बहिरम देव, फडाची देवि, बहिरि भवनि, महादेव, खन्डेराव, महालक्ष्मि
२ ग्रामदेवता –
गावशिवारि – गाव देवि, तोरणी चेडा, मखरि चेडा, गावचे मेट्करी,
३ अरध्य दैवत –
चान्द सुर्या, हतोबा, भिल्लोबा, विर, गवळि चेडा, सवर्या, बाया गवला.

आपलि वाद्य

आपलि वाद्य
१ तारपा
२ धोल
३ पावा
४ मोहरि पावा
५ ढोलकि
६ घान्गळि
७ काहळि
८ साम्बळ
९ तुणतुणा
१० टबला
११ धुमशा (तुर)
१२ डाका
१३ आउज
१४ डेरा
१५ रिरेटि
१६ मान्दोळ
१७ घुन्गुरकाठि
१८ चाळ
१९ काठा

lagin – halad rit [ लगिन हलदिचि रित ]

आपलि सन्स्क्रुति

आपलि सन्स्क्रुति

आपल्य सस्न्क्रुतित बर्याच कला चा समावेश होतो…

काहि प्रसिद्ध नचाचे प्रकार दिले आहेत…
१. ढोल नाच
२. तारपा नाच
३. डेरा
४. टिपरि
५. डबला
६. धुमशा / तुर
७. कामडि
८. मन्डोल
९. गवरि / गौरि
१०. सान्गड नाच
११. रितेरि
१२. घोर नाच

आपले देव –
आपण खुप वेग वेगळ्या देवतान्चि पुजा करत आलोय… पण आपले पारम्परिक देव विसरु नका…

काहि कुल्दैवेते…
१. हिरवा
२. चिता
३. झोटिन्ग
४. हिमाय
५. कनसर्या बाल
६. बैलचा टान्डा
७. नराण देव
८. बहिराम देव
९. पडाचि देवि
१०. बहिरि भवानि
११. महादेव
१२. खन्डेराव
१३ महालक्ष्मी

ग्राम देवता..

१. गाव शिवारि / गाव देव
२. तोरणी चेडा
३. मखरि चेडा
४. गावचे मेटकरि
५.राणशिवारि – वघोबा

आरध्य दैवते…

१. चान्द सुर्य
२. हातोबा
३. भिलोबा
४. विर
५. गवळि
६.चेडा
७. सवर्या

lagin umbar medh[ लगिन उम्बर मेढ]

lagin- mandav ferya [लगिन मान्डवातल्या रिति

lagin – mandav [ लगिन मन्डवाचि रित ]

lagin – gharatiali rit [ लगिन घरातली रित ]

lagin – bhet rit [ लगिन- भेट रित ]