about AYUSH [ marathi ]
December 1, 2010 Leave a comment
आयुश विषयी काही
|
हे एक सुशिक्षित आदिवासी तरूण जे आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी काही करण्यास उत्सुक आहेत, अशा तरुणांनी एकत्र येऊन बनवलेले व्यासपीठ आहे.
|
आपले ध्येय
|
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे वैयक्तिक, समुह किवा संस्था यांना एकत्र आणून त्यांच्या मदतीने आदिवासींचा विकास करणे
– वेग वेगळ्या क्षेत्रातिल अनुभविंना एकत्र आणून अनुभव आणि ज्ञान वाटण्या साठी ज्ञानाचे जाळे बनविणे – ज्ञानाच्या जाळ्याचा उपयोग करून ग्रामीण विद्यार्थ्यांना मदत / मार्गदर्शन करणे – ग्रामीण विद्यार्थांना व्यवसाय आणि शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि मदत करणे – आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन आयुष्यात आणि समाजोन्नती च्या कामात करून घेन्या करिता जागरुकता करणे – शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना सोबत आणणे आणि सध्याचे तसेच भविष्यातील स्पर्धेची ओळख करून देणे – आदिवासी तरुणा मध्ये आत्मविश्वास तयार करणे आणि भविष्यातील स्पर्धे साठी तयार करणे – पारंपारिक कला आणि संस्कृती विषयी जागरुकता करणे आणि सध्या जीवन माना नुसार पारंपारिक कला आणि संस्कृती जोपासणे – जाती भेद आणि पंथ भेद रोखणे आणि अखंड आदिवासी समाजा ची एकता टिकवणे – परावलंबी पण नाहीसा करून आदिवासी तरुणांना स्वालंबी बनविणे |
आपली दृष्टी
|
आ – आदिवासी संस्कृती जपूया
यु – युवकांनो एकत्र येऊया श – शक्ती एकवटून जगाशी भिडूया |
आयुश का ?
|
– आपल्या समाजात अनुभवी, हुशार, होतकरू असे बरेच जन आहेत. पण त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजातील गरजूंना करवुन घेण्या सठि
– आपल्या समाजातील बरेच जन विविध शहरात राहतात, पण अशांचा गावा सोबत कोणताही औपचारिक संबध स्थापित करणे अथवा ग्रामीण भागातील किवां समाजातील समस्या सोडविण्यात सहभाग करुन घेणे – ज्या लोकांना आपल्या समाजा साठी काही करण्याची इच्छा असते. पण खास आदिवासी समाजा साठीचे स्वतंत्र आणि आजच्या काळा नुसार ध्येय आणि उद्देश असलेले योग्य व्यासपीठ म्हणुन काम करणे – आपल्याला स्वतः आणि दुस-या अदिवासीला यशस्वी केल्याचे व त्यासाठी प्रयत्न केल्याचे समाधान आहे |
आपण कसे करणार?
|
– वेग वेगळ्या लोकांना जोडणे [ मेल, ब्लोग्स, संकेतस्थळे, सामाजिक जाळे, चर्चा आणि समूह, internet, sms चा उपयोग करून]
– वेग वेगळ्या चर्चा आणि सवांद आयोजित करणे [ अनुभवी माणसे, विद्यार्थी, व्यावसायिक, प्रतिष्ठीत इ ] – सामाजिक, शिक्षणिक, व्यवसाय मार्गदर्शन, सांस्कृतिक आणि असे विविध कार्यक्रम भरवणे – ह्यामुळे आदिवासी तरुणात आत्मविश्वास तयार होऊन आपले ध्येय पूर्ण होण्यास मदत होईल |
कोण करणार?
|
– संपर्कात आलेल्या विविध माणसा कडून आपल्या ध्येय पुरती साठी मार्गदर्शन आणि सहकार्य अपेक्षित आहे ज्या मुले आपण आपला समाज विकासाच्या कामांना गती देवू शकुत
– संपर्कात आलेल्या ग्रामणी भागातील तरुणाकडून कार्याक्रम भरवणे आणि संबधित सहकार्य अपेक्षित आहे |
संपर्कात या
|
– जर आपणाला सोबत यावेसे वाटत असेल तर जरूर मेल करा
– आपले ध्येय आहे कि सगळ्या आदिवासी पर्यंत पोहोचणे, म्हणून आणखीन लोक जोडण्यास आपले सहकार्य अपेक्षित आहे |
चला सोबत करूयात
|
– आयुश च्या कार्यात मदत/सहकार्य करू इच्छित असणाऱ्यांचे स्वागत आहे, अधिक माहिती साठी “support us ” मध्ये आयुश च्या संकेत स्थळावर पहा
|
AYUSH – ensuring tribal success
|